Breaking News

जीएसटी विरोधात व्यापार्‍यांचा बंद

अहमदनगर, दि. 29 - येत्या एक जुलै रोजी लागू होणार्‍या जीएसटीच्या विरोधात नगर शहरातील कापड बाजार बुधवार दि.28 रोजी बंद ठेवण्यात आला. अहमदनगर कापड व्यापारी असोसिएशनच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे  शहरताील अनेक ठिकाणी व्यापार्‍यांनी बंद ठेवून विरोधा दर्शविला आहे. 
दरम्यान, बुधवारी कापड बाजार बंदच असल्याने शाळेच्या साहित्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होताना दिसत होते. आजच्या या बंदने दोन ते अडिच कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचे शहरतील व्यापारी वर्गात बोलले जात होते.
सुरत, अहमदाबाद, राजस्थान, पंजाब दिल्ली येथे मंगळवारी (27 जून) बंद ठेवण्यात आला होता. या बंदला पाठिंबा देण्यासाठी नगरच्या व्यापार्‍यांनी बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील व्यापार्‍यांमध्ये आज दुही दिसुन आली आहे. येथील काही व्यापार्‍यांनी दुकाने सुरु ठेवली होती.