Breaking News

कर्जमुक्तीच्या शासन निर्णयाचे बोळे तोंडात कोंबुन शासनाचा निषेध

स्वाभिमानीसह गोद्री येथील शेतकर्‍यांनी केले अनोखे आंदोलन

बुलडाणा, दि. 24 - शासनाने कर्जमुक्ती जाहीर केली परंतु सदर कर्जमुक्ती निकषांच्या भोवर्‍यात अडकून पडली आहे. कर्जमुक्तीची अंमलबजावणी होईपर्यत शासनाने दहा हजार रूपये देणार असल्याचे घोषीत केले. परंतु तालुक्यातील शेतकरी बँकांकडे वारंवार चकरा मारीत आहे.परंतु दहा हजार रूपये मिळत नाहीत.यामुळे अनेकांची पेरणी अडकुन पडली आहे.त्यामुळे शासनाचा निषेध म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व गोद्री येथील शेतकर्‍यांनी शासन निर्णयाचे बोळे करून शासन निर्णय तोंडात कोंबत शासनाविषयी रोष व्यक्त करीत दि. 21जुन रोजी गोद्री येथे अनोखे आंदोलन केले. कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी या नैसर्गिक संकटाचा सामना जिल्ह्यातील शेतकर्‍यांना करावा लागला आहे तर पेरणीचा खर्चही निघणार नाही अशी परीस्थीती दोन वर्षाअगोदर निर्माण झाली होती. तर यावर्षी पेरलं चांगल्या प्रमाणात उगवलं उत्पन्न बरं झालं परंतु भाव कोसळले तर तुरीला शासनाने हमीभाव देऊन तुर खरेदी सुरू केली परंतु त्यातही शेतकरी चांगलाच भरडुन निघाला आहे. या सर्व अडचणी दुर व्हाव्यात म्हणुन शेतकर्‍यांनी संप करीत शेतकर्‍यांची संपुर्ण कर्जमुक्ती झाली पाहीजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, यांसह मागण्या घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरला परंतु यावर तोडगा काढीत शासनाने तत्वत:शब्द घालुन कर्जमुक्ती जाहीर केली परंतु यात अनेक निकष लावण्यात आले.आणि कर्जमुक्तीची अमलबजावणी होईपर्यत दहा हजार रूपये देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु बँका शेतकर्‍यांना कर्ज तर देतच नाहीत. आणि निर्णया नुसार दहा हजार देण्यास तयार नाहीत. यामुळे अनेकांची पेरणी अडकुन पडली आहे. पेरले नाही तर उगवेल काय आणि खाणार काय असा प्रश्‍न निर्माण होत असल्याने शासन यावर गंभीर नसल्याने शासनाला जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधीकारी आणि तालुक्यातील गोद्री येथील शेतकर्‍यांनी कर्जमुक्ती निकष अमान्य असल्याने शासन निर्णयाचे बोळे तोंडात कोंबुन अनोखे आंदोलन करीत शासना विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.व शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,पेरणी करीता शेतकर्‍यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री व मंत्री चंद्रकांत पाटिल यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली आहे. या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाउपाध्यक्ष विनायक सरनाईक,जिल्हासरचिटनिस नितिन राजपुत,युवा आघाडी तालुकाध्यक्ष दिपक सुरडकर,तालुकाध्यक्ष भारत वाघमारे,भरत जोगदंडे,प्रमोद मुळे,विजय सुरोशे,अमोल अंभोरे,मनोहर परीहार,यासह गोद्री गावातील शेतकरी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.