Breaking News

पेट्या रॅन्समवेअर व्हायरसमुळे ‘जेएनपीटी’तील कामकाज बंद

नवी दिल्ली, दि. 28 - काल (27 जून) पेट्या रॅन्समवेअर व्हायरसमुळे भारतातील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथील कामकाज बंद पडल्याचे  सांगण्यात येत आहे.गेल्या महिन्यात ‘वान्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसचा फटका जगातील 150 देशांना बसला होता.
रॅन्समवेअर हा मालवेअरचा एक प्रकार असून यामुळे संगणकामधील डेटा रिमोटच्या मदतीने लॉक करता येतो. रॅन्समवेअरच्या मदतीने हॅक केलेला संगणक अनलॉक  करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करत असून काल (27 जून) पुन्हा एकदा रॅन्समवेअरने हल्ला केला. ‘पिटरॅप’ हे वान्नाक्राय या व्हायरसचे नवीन व्हर्जन असल्याचा  अंदाज वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी भारताला या हल्ल्याची झळ बसणार नसल्याचे सांगण्यात आल होते. मात्र काल रात्रीपासून जेएनपीटीतील ऑनलाईन माध्यमातील  कामकाज बंद झाले आहे.