Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या सत्तेवर नांगर फिरवू : आ. बच्चू कडू

मुंबई, दि. 06 - शेतकरी संपाचं श्रेय कुणीही एकानं घेऊ नये असं आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. अल्पभूधारकांना कर्जमाफी ही  मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. शेतकार्‍यांसोबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं तर मग तुमच्या सत्तेत नांगर घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.  मुख्यमंत्री इतके लबाड बोलतात की त्याची हद्द नाही. शेतकार्‍यांना सावरण्याऐवजी टवाळक्या करत असाल, तर शेतकरी तुमची टाळकी फोडल्याशिवाय राहणार नाही,  असा सज्जड दम बच्चू कडूंनी दिला.
राज्यात पहिल्यांदा शेतकर्‍यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली हेच मोठं यश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  तसंच सदाभाऊंचा शेतातल्या बुजागणासारखा सरकारकडून  वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. निव्वळ महाराष्ट्र बंद नाही तर साले म्हणणार्‍या दानवेसारख्या वानरतोंडया माणसाला बंद करण्याची ताकद हा  शेतकरी दाखवून देईल. हंसराज अहिर म्हणतो जीन्स पॅन्ट घालून शेतकरी आंदोलन करतात का, तर मग काय आम्ही चड्डीवर करायचं का? आम्ही जर कापूस  पिकवला नाही तर यांना पण घालायला चड्डी राहणार नाही हे विसरू नये, असा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी केला. मोदी म्हणतात 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात  देऊ, पण आधी हमी भाव तर द्या, असा टोला बच्चू कडूंनी लगावला.