Breaking News

संबोधीच्या सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात 75 जोडपे विवाहबध्द

नेत्रदिपक विवाहसोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

परभणी, दि. 06 - संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 वा सामुहिक विवाह सोहळा अनेक मान्यवर व हजारोंच्या उपस्थिततील महात्मा फुले हायस्कूल जिंतूर रोड, परभणी येथे 3 जून रोजी संपन्न झाला. मंगल परिणाय विधी पुज्य भदन्त काश्यप यांनी पार पाडला या सोहळ्यात बौध्दविवाह पध्दतीने 65 जोडपे व हिंदू विवाह पध्दतीने 10 जोडपे असे एकुण 75 जोडपे विवाहबध्द झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना मा.न्या.सी.एल.थूल, सदस्य अनुसूचीत जाती जामाती आयोग, मुंबई हे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारने चालणारी संबोधी अकादमीने मागासवर्गीय, अल्पसंख्याक व गरीब बांधवांचा आर्थिक विवंचना लक्षात घेऊन सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे, ही एक अत्यंत भूषणावह बाब आहे. तसेच ते म्हणाले की, शासनाच्या कन्यादान योनजेतंर्गत संबोधी अकादमीच्या मागणीनुसार रुपये 50000 अनुदान मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा करीन.
यावेळी प्रमुख अतिथी मा.पो.शिव शंवकर (जिल्हाधिकारी परभणी) हे म्हणाले की, सामुहिक विवाह सोहळा हीच चळवळ बनली पाहिजे. सर्वांना आदर्श वाटेल अशा पध्दतीचा सोहळा संबांधीने आयोजित करुन समाज परितर्वनास हातभार लावला आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मा.दिलीप झळके, जिल्हा पोलिस अधिक्षक परभणी हे म्हणाले की, अनेक रुढी व परंपरा यांना फाटा देऊन होतकरुंच्यया आर्थिक विवंचना लक्षात घेऊन सामुहिक विवाह सोहळा ही आजच्या पिढीचे गरज ओ. सर्वांनी या चळवळीला मदत केली पाहिजे.
प्रस्ताविक करतांना भीमराव हत्ती अंबोरे,(अध्यक्ष संबांधी अकादमी महाराष्ट्र) हे म्हणाले की, गरीब माणसाची विवाहासाठी खर्च करण्याची परिस्थिती नसतांना इतरांचा बडेजाव पाहून आवश्यक खर्च करुन जी आर्थिक विवंचना होऊन कर्जबाजारीपणा वाढतो. ही बाब लक्षात घेऊन समाजाला मदत करण्याच्या हेतुने गेल्या 18 वर्षापसून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कले आहे.
तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन तेजस माळवदकर (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,परभणी),वाय.एस.बागडे (माजी विशेष लेखा परिक्षक, नागपूर), विजय साळवे (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण), छायाताई कुलाळ( सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली), बाबुराव आदमाने (कार्यकारी अभियंता, रस्ता विकास महामंडळ, जालना), अशोक घोरबांड (पोलिस निरीक्षक), देविदास इंगोले (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, हिंगोली)आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बाहारदार सूत्रसंचालन दि.फ.लोंढे यांनी तर आभार भगवान जागताप यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अरविंद साळवे, सिध्दार्थ भराडे, भीमराव पतंगे, बबन शिंदे, बी.आर.आव्हाड, डी.आर.तुपसमिंदर,विश्‍वनाथ दवडे,अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, भगवान मानकर, ममता पाटील, ज्ञानेश्‍वर हरकळ,धनंजय रणवीर, राजेश चांदणे, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, बाबासाहेब भराडे, सुंदर चव्हाण, विशाल जल्हारे, विशाल जल्हारे आदींनी परिश्रम केले.