महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबणार
मुंबई, दि. 06 - केरळमध्ये तुलनेनं लवकर दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे मान्सून अद्याप केरळमध्येच रखडलाय.
अरबी समुद्रातून गती मिळत नसल्याने मान्सून केरळच्या पुढे सरकलेला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 जूनला म्हणजे आज मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र मान्सूनचं आगमन लांबले आहे.
अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे आता मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याचा अंदाज वर्तवणं तुर्तास तरी कठीण दिसत आहे. भारताच्या पुर्वेकडून मात्र मान्सूनला चांगला वेग आहे. पूर्वेकडून आसामधून मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.