Breaking News

भारत व अमेरिकेदरम्यान ‘गार्झियन ड्रोन’च्या विक्रीचा करार

वॉशिंग्टन, दि. 28 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला  असून त्याचाच एक भाग म्हणून भारत व अमेरिकेदरम्यान ‘गार्झियन ड्रोन’च्या विक्रीचा करार झाला आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार  भारत व अमेरिका दरम्यानची सुरक्षा क्षेत्रातली भागीदारी वाढवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आम्ही उचलले असून ‘सी गार्जियन अनमॅन्ड एरियल सिस्टम्स’ म्हणजे  ‘गार्झियन ड्रोन’च्या विक्रीचा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारताची सुरक्षा क्षमता विस्तारणार असून उभय देशांमधील संबंध अधिक चांगले  होतील, असे त्यात म्हटले आहे.