Breaking News

शहीद जवान साहब शुक्ला यांच्या कुटुंबीयांना योगी सरकारकडून आर्थिक मदत

लखनौ, दि. 27 - जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शहीद जवान साहब शुक्ला यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. योगी आदित्यनाथांनी यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांसह संवाद साधत त्यांना दिलासा दिल्याचे सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले.
तुमच्या दु:खाच्या क्षणी सरकार सदैव तुमच्यासोबत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. शहीद जवानाच्या पत्नीस 20 लाख रुपये तर पालकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. 24 जून रोजी श्रीनगरमधील पान्था भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला यात हेड कॉन्स्टेबल साहब शुक्ला शहीद झाले तर एक जवान जखमी झाला. श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्ग खुला करत असतांना ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.