नागरदेवळे ग्रा.प. हद्दीतील कचर्यांची विल्हेवाट लावावी
अहमदनगर, दि. 06 - गेल्या कित्येक महिन्यांपासून नागरदेवळे ग्रा.पं.हद्दीतील शिवनगर आलमगीर, लक्ष्मीनगर, फुलारी टावर्स चौक आदी भागात ठिकठिकाणी ओला व सुका कचर्यांचे ढिग पडले आहेत. पावसाळा सुरु झाला तरी या कचर्याची विल्हेवाट ग्रा.पं.ने अद्याय लावली नाही. पावसाळ्यात या कचर्यांमुळे ओढे-नाले तुबुन परिसरातील घरात पाणी येते दुर्गधीमुळे रोगराई पसरते तरी ग्रा.पं.ने तातडीने या कचर्याची विल्हेवाट लावाली अशी मागणी भिंगार शिवसेना विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांनी सरपंच राम पानमळकर यांना लेखी निवेदनाव्दारे केली.
निवेदनाची दखल घेत सरपंच पानमळकर यांनी कचरा उचलण्यासाठी अद्यावत यंत्रसामुग्रीची व्यवस्था करण्यासाठी तातडीने पावले उचलली असून लवकरच कचर्याची विल्हेवाट लावून हि समस्या कायम स्वरुपी सोडवू असे आश्वासन दिले. एक महिन्यात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर शिवसेना पक्ष शिवसेना स्टाईलने तीव्र आदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. निवेदनावर सचीन पाखरे, अक्षय साळवे, आदित्य दातरंगे, वैभव शिंदे, अक्षय देठे, दिपक पवार, जी. बी. बोर्डे, अलम क्षीरसागर, रवि रोकडे यांच्यासह विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांच्या स्वाक्षर्या आहेत.