8 हजाराहून अधिक मोबाईल लंपास करणा-या ‘सॅमसंग’च्या कर्मचा-याला अटक
सेऊल, दि. 10 - जुगाराच्या नादापायी दोन वर्षांच्या कालावधीत 8 हजार 474 मोबाईल फोन चोरणा-या सॅमसंग कंपनीच्या दक्षिण कोरियातील कर्मचा-याला अटक करण्यात आली. ली असे त्याचे नाव आहे. जुगारातील उधारी चुकती करण्यासाठी ली याने मोबाईल फोन चोरल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
जुन्या मोबाईल फोनचा लेखाजोखा ठेवण्याचे काम ली याच्याकडे होते. ली हा शारिरीक व्यंगामुळे इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअरचा वापर करत असे. त्यामुळे दैनंदिन मेटल डीटेक्टर तपासणीत त्याला सूट होती. याचाच गैरफायदा घेत ली याने डिसेंबर 2014 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत व्हीलचेअरमध्ये लपवून त्याला लेखाजोखा ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या जुन्या फोनपैकी 8 हजाराहून अधिक फोन लंपास केले. हे फोन एका विश्वासू दुकानदाराला विकून त्याने सुमारे 4.5 कोटी रूपयांचा नफादेखील कमवला.
सॅमसंग कंपनीचे विक्रीसाठी नसलेले (नॉट फॉर सेल) मोबाईल फोन व्हिएतनाममध्ये वापरात असल्याचे समजल्यावर व्यवस्थापनाने डिसेंबर 2016मध्ये या संदर्भात तक्रार केली. या तक्रारीनंतर तपासाअंती ली हे मोबाईल लंपास करत असल्याचे उघडकीस आले.