पृथ्वीला उत्तम ग्रह बनवण्यासाठी वचनबद्ध रहा - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, दि. 06 - पर्यावरणाचे संरक्षण आणि पृथ्वीला उत्तम ग्रह बनवण्यासाठी वचनबद्ध रहा असा संदेश आज पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिला. यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करणा-या नागरिकांच्या कार्याचेही कौतुक केले.
ते म्हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण आणि पृथ्वीला उत्तम ग्रह बनवण्यासाठी वचनबद्ध राहण्याची आठवण करुन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस हा उत्तम दिवस आहे. यंदा ‘कनेक्टिंग पीपल टू नेचर’ ही थीम ठेवली असून नागरिकांना निसर्गाशी जोडणे हे यावर्षीचे मुळ लक्ष्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
मागील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पॅरिस जलवायू करारातून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आताच्या पिढीने भावी पिढीचा स्वच्छ पृथ्वीवर राहण्याचा अधिकार हिसकावून नाही घेतला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.