Breaking News

2019 मध्ये सत्तेत आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा - राहुल गांधी

गुंटूर, दि. 06 - 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी  यांनी दिले. येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी सत्तेत आल्यास आंध्र प्रदेशला दहा वर्षांसाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन दिले  होते. मात्र पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपले आश्‍वासन पाळले नाही. तिरुपतीमध्ये भगवान व्यंकटेश्‍वर मंदिरासमोर दिलेले आश्‍वासन पंतप्रधान मोदी  यांनी पाळले नाही. मंदिरासमोर दिलेली आश्‍वासनेही पाळली जात नसतील, तर हे कसले हिंदू, अशी बोचरी टीका त्यांनी केली. विशेष राज्याचा दर्जा कोणती भेट  नसून हा आपला हक्क आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तो आपल्याला दिला आहे आणि हा हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे  त्यांनी सांगितले.