Breaking News

चीनच्या टीकेनंतर भारताने नाकारला ऑस्ट्रेलियाचा संयुक्त लष्करी सरावाचा प्रस्ताव

नवी दिल्ली, दि. 01 - सर्वाधिक लष्करी सराव करण्यावरून चीनकडून भारतावर टीका करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने संयुक्त लष्करी सरावाचा  ऑस्ट्रेलियाचा प्रस्ताव नाकारला आहे. चीनच्या नाराजीच्या भीतीने भारताने अमेरिका व जपानसह होणा-या संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्याचा ऑस्ट्रेलियाचा  प्रस्ताव नाकारला आहे. जुलैमध्ये होणा-या लष्करी सरावात पर्यवेक्षक म्हणून सहभागी होण्याबाबतचे पत्र ऑस्ट्रेलियन सरकारकडून 2017च्या जानेवारीमध्ये भारताच्या  संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यावर भारताकडून नकार देण्यात आला असून बंगालच्या उपसागरात होणा-या तीन देशांचा संयुक्त सराव पाहण्यास  ऑस्ट्रेलियन अधिका-यांना पाठवण्याचे आमंत्रण दिले आहे, असे अधिका-यांनी सांगितले.
भारताने हा प्रस्ताव नाकारला असला तरी अमेरिका व जपानने हा प्रस्ताव स्विकारला आहे. चीन हिंदी महासागरातील कारवायांमध्ये वाढ करेल अशी भीती भारताला  असल्याने भारताकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे समजते.