Breaking News

कुलभूषणप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकची बाजू महाधिवक्ते अश्तर औसाफ मांडणार

इस्लामाबाद, दि. 01 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आता पाकिस्तानचे महाधिवक्ते अश्तर औसाफ अली पाकच्या चमूचे  नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी पुढील प्रक्रियेसंदर्भात ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संबंधीत अधिका-याची 8 जून रोजी भेट घेणार आहेत.
डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवर आधारित संसदीय समितीची मंगळवारी बैठक झाली. यावेळी महाधिवक्ते अश्तर औसाफ  अली यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी सुनावणी करणा-या न्यायालयाच्या पीठात पाकिस्तानी न्यायाधीशाचा समावेश नसल्याने  पाकिस्तान कार्यवाहक न्यायाधीशाच्या मागणीच्या तयारी असल्याचे समजते. या प्रकरणी पुढील सुनावणी 8 जून रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार आहे.