Breaking News

सुनंदा सोनटक्के शिराळ्याच्या पहिल्या नगराध्यक्षा

सांगली, दि. 17 - शिराळा नगरपालिकेच्या पहिल्या नगराध्यक्ष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती सुनंदा गजानन सोनटक्के, तर उपनगराध्यक्षपदी कीर्तीकुमार पाटील यांची  बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी या नूतन नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष यांचा सत्कार केला.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाच्या ऍड. श्रीमती नेहा सूर्यवंशी व स्वाती कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने श्रीमती सुनंदा सोनटक्के यांची  निवड निश्‍चित झाली होती. उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कीर्तीकुमार पाटील यांचा एकमेव उमेदवारी  अर्ज दाखल झाला.
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, प्रशासक तथा तहसिलदार दीपक शिंदे व मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी नगराध्यक्षपदी श्रीमती सुनंदा  सोनटक्के, तर उपनगराध्यक्षपदी कीर्तीकुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिराळा शहरातून  विजयी ङ्गेरी काढत ङ्गटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. या निवडीवेळी मानसिंगराव नाईक, शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती ऍड. भगतसिंग  नाईक, उपसभापती सम्राटसिंह नाईक, प्रमोद नाईक, विराज नाईक, विजयराव नलवडे व बसवेश्‍वर शेटे आदी उपस्थित होते.