Breaking News

औरंगाबादमध्ये जुन्या नोटांचा पाऊस

औरंगाबाद, दि. 12 - औरंगाबादमध्ये चलनातून बाद झालेल्या नोटांचा पाऊस पडला या नोटा झुडपाला लटकत होत्या .येथील सिडको पसिरात 500 आणि 1000  रुपयांच्या नोटा सिडको एन -2 कामगार चौकाजवळील एका भूखंडावर अढळून आल्या सदर भुखंड जंगले यांचा असून त्यावर गवत व झुडपे उगवली आहेत.या पैकी  एका झुडपाच्या फांदीला लटकेल्या एका जुनाट पिशवीतून या नोटा पडत होत्या.एका व्यक्तीने पोलिसांना सदर माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे,  पोलीस उपनिरीक्षक सुषमा पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण कापरे, एसं बी . सोहळे, माधुरी खरात यांनी घटनास्थळी जाऊन नोटा जप्त केल्या .या नोटांची किंमत दहा  लाखाहून अधिक आहे.