काचेच्या घरात राहणारेच भिरकावताहेत दगड...!
दि. 07, जून - विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते शेतकर्यांच्या आंदोलनांत सक्रियपणे सहभागी होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात न घेता त्यांच्यावर टीका केली जात आहे. जे टीका करतात त्यांनी शेतकर्यांसाठी कोणते योगदान दिले हे माञ त्यांना विचारू नका.ते स्वतःहून तर सांगणार नाहीतच.
गेल्या सात दिवसापासून राज्यात शेतकरी संपावर आहेत. हा संप चिघळल्याने सरकार विरोधात शेतकरी, विरोधीपक्ष असा सामना रंगला आहे. या सर्व घडामोडी राधाकृष्ण विखेंचे दर्शन झाले नाही.उलट त्यांनी पुणतांब्याच्या काही शेतकर्यांना मुख्यमंञ्यांच्या भेटीला नेले आणि शेतकर्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप काही राजकीय द्वेषाने पछाडलेल्या प्रवृत्ती करीत आहेत.असा बिनबुडाचा आरोप करतांना आपण स्वतःच काचेच्या राहतो दुसर्यावर भिरकावलेला दगड निसर्गाच्या नियमाने तेव्हढ्याच वेगात माघारी येऊन आपल्या घराची काच तडकू शकते याचेही भान या मंडळींना नाही.
ना. विखे आणि त्यांच्या घराण्याने शेतकर्यांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे हे महाराष्ट्राला पटवून देण्यासाठी कूणा आयोग्याच्या शिफारशीची गरज नाही. महाराष्ट्र ते जाणतो.शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या प्रत्येक आंदोलनाला . काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 27 जिल्ह्यात काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे या सरकारचे शेतकरी विरोधी धोरण चव्हाट्यावर आले आणि त्यातूनच शेतकर्यांचा संतापाचा उद्रेक होऊन आज राज्यभर आंदोलने होताना दिसत आहेत.त्याचे श्रेय विरोधी पक्षनेता म्हणून ना,विखे यांना कुणी दिले नाही तरी महाराष्ट्र देणारच.ही सल या मंडळींना खरेतर बोचते आहे.
कुठल्याही प्रकारची माहीती नघेता केवळ पुर्वग्रह मनात ठेवून विखे यांना लक्ष्य केले जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते या आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकले नाहीत. मागील आठवड्यापासून ते उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना 15 दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. संघर्ष यात्रेचा चौथ्या टप्प्यात त्यांना ही दुखापत झाली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ती गंभीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे विश्रांती घेणे अनिवार्य झाले होते,ही
वस्तुस्थिती जाणून न घेता विरोधी पक्षनेत्यांवर चिखलफेक करणार्यांच्या बुध्दीची किव करावी तेव्हढी थोडीच. विखे पाटील कुटुंबांच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा शेतकरी हाच केंद्रबिंदू राहिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री असताना प्रामाणिकपणे शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आजवरच्या प्रत्येक अधिवेशनात आक्रमकपणे कर्जमाफीची मागणी लावून धरली. शेतकर्यांच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झाले. या पश्चातही त्यांच्यावर विनाकारण बिनबुडाची टीका करणार्यांनी शेतकर्यांसाठी कोणते योगदान दिले? हा प्रश्न किती दिवस अनुत्तरीत ठेवणार.