नांदोशी खबालवाडी पाझर तलावाचा सर्व्हे करा
औंध, दि. 24 (प्रतिनिधी) : औंध परिसरातील त्रिमली, नांदोशी, खबालवाडी, जायगाव गावच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी नांदोशी-खबालवाडी गावच्या हद्दीत पाझर तलाव बांधण्यासाठी तात्काळ सर्व्हे करून अहवाल सादर करावा, असे आदेश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी संबंधित खात्याच्या कार्यकारी अभियंता यांना दिले असल्याची माहिती उपसरपंच नवल थोरात यांनी दिली.
नांदोशी, खबालवाडी गावांना नैसर्गिक देणगी लाभली आहे. या परिसरातील डोंगराच्या खोल दर्यामध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी अडवून हे पाणी या परिसरातील शेतीला देऊन शेतीपाणी प्रश्नांवर मात करता येईल. यासाठी येथे पाझर तलाव बांधण्यात यावा, याबाबत पवारवाडी ता. कोरेगाव येथे जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना नांदोशीचे उपसरपंच नवल थोरात व खबालवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. जलयुक्त शिवार अभियानासाठी अग्रेसर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
याबाबत मंत्रालयात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, नांदोशीचे उपसरपंच नवल थोरात, वडूजचे नगरसेवक अनिल माळी, प्रकाश चव्हाण यावेळी उपस्थित होते. पिढ्यानपिढ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नांदोशी, खबालवाडी परिसराचा सर्व्हे करून त्याबाबतचा अहवाल जलसंधारण खात्यास सादर करावा, असे आदेश इरिगेशनचे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ना. शिंदे यांनी दिला.