Breaking News

सहारनपूर हिंसेप्रकरणी भीम सेनेच्या प्रमुखाला अटक

सहारनपूर, दि. 09 - उत्तर प्रदेशामधील सहारनपूर जिल्ह्यात उसळलेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी भीम सेनेचा प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण याला  पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेे होते. त्याला पोलिसांनी हिमालच प्रदेशातील डलहौसी येथील सुभाष चौकातून अटक  केली असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रशेखरची माहिती देेणा-यास बारा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
सहारनपूर येथे झालेल्या हिंसाचारादरम्यान चंद्रशेखर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर भाषण दिले होते. बुधवारी त्याच्या दोन सहका-यांनाही अटक  करण्यात आली आहे.
भीमसेनेने 5 मे रोजी सहारनपूरमधील हिंसेविरोधात आंदोलन केले होते. यावेळी भीम सेनेकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक आणि पोलीस चौकीची तोडफोड करण्यात  आली होती, असे वरिष्ठ पोलीस अधिक्षक बबलू कुमार यांनी सांगितले.