समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणार - महापौर
पुणे, दि. 21 - समान पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने कर्जरोख्यांमधून उभारलेले 200 कोटी रुपये महापालिका तिजोरीत आज जमा झाले. यामुळे आता या योजनेच्या कामाला गती मिळणार असल्याचा दावा महापौर आणि आयुक्तांनी केला आहे. महापालिकेच्या कर्जरोख्यांवर मुंबई शेअर बाजारात बोली झाली. त्यामध्ये 21 गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले होते. ऑनलाइन बोलीमध्ये कर्जरोख्यांना सहा पटीने जास्त मागणी आली. अखेर 7.59 टक्के व्याजदराने कर्जरोखे काही वित्तीय कंपन्यांनी घेतले.
या योजनेसाठी सुमारे 2 हजार 264 कोटी रुपये लागणार आहेत. एवढा मोठा निधी महापालिका ऐनवेळी उभे करू शकत नाही. त्यामुळेच कर्जरोख्यांचा पर्याय निवडण्यात आला आहे. पाण्याची असमानता घालवण्यासाठी हा तातडीने मार्ग मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.