प्रवरेचा राजा झाला उदार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘जनसेवा’चा आधार
दि. 06, जून - शेतकर्यांच्या संपावर महाराष्ट्रात सर्वदूर राजकारण सुरू असतांना विकासाची पंढरी असलेल्या प्रवरानगरमध्ये विकासाचा वारकरी आत्महत्याग्रस्त शेतकर्याचे कुटूंब पुन्हा खंबीरपणे ऊभे रहावे म्हणून योजना राबवतो आहे. डॉ. सुजय विखे हे आहे त्या वारकर्याचे नाव. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार्या विखे पाटील कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले डॉ. सुजय विखे यांनी उध्वस्त झालेल्या शेतकर्याला सावरण्यासाठी महत्वाकांक्षी योजना आखली आहे.
जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रात बळीराजाचा आक्रोश सुरू आहे. शेतीमालाला शाश्वत भाव मिळत नसल्यामुळे मशागतीवर केलेला खर्चही माल विक्रीतून पदरात पडत नाही. तोंडमिळवणी करण्यासाठी सरकारी आणि खाजगी कर्जाच्या विळख्यात शेतकरी सापडतो. त्यात निसर्गाच्या लहरीची टांगती तलवार. रोजचा खर्च भागत नाही त्यात मुलामुलींचे शिक्षण आणि लग्न ही विवंचना शेतकर्याचे जगणं अशक्य करते, अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याशिवाय अन्य पर्याय समोर नाही. शेतकयाने तोही मार्ग चोखाळला. निर्लज्ज राज्यकर्त्यांना कुठलाच फरक पडला नाही. मग अखेरचा पर्याय म्हणून शेतकर्याने संपाचं हत्यार उगारलं. त्यातही अनेकांनी राजकीय फायदा घेत ईथेही टाळूवरच लोणी चाटण्याचा अघोरी प्रयत्न केला.
लोणी प्रवरानगरमध्ये माञ या दरम्यान एक वेगळच मंथन सुरू होतं. प्रश्न मांडण्यासाठी सारेच पुढे येतात. उत्तर मात्र कुणीच देत नाही. स्वतः जवळ उत्तर असूनही केवळ इच्छाशक्ती नसते, शेतकर्याचे प्रश्न मांडतांना त्याची अडचण सोडविण्याची ताकद सर्वच राजकीय नेत्यांकडे आहे. मात्र कमावलेल्या अपसंपदेची हाव सुटत नाही. विखे पाटील घराण्याच्या चौथ्या पिढीचे शिलेदार डॉ. सुजय विखे यांनी माञ ते उदार धाडस दाखविले आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्याूंच्या कुटुंबाला पुन्हा उभे करण्याची योजनाच जाहीर केली.
आपले आजोबा भारताचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पद्मश्री बाळासाहेब तथा एकनाथराव विखे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण आणि पिताश्री विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे संयुक्त औचित्य साधून डॉ. सुजय विखे यांनी आत्महत्याग्रस्त 208 शेतकरी कुटुंबाच्या पदरात या योजनेचे दान टाकण्याचा संकल्प सोडला आहे.
येत्या पंधरा जून पासून पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्यता योजनेचा औपचारिक शुभारंभ होईल.
या दोनशे आठ कुटुंबातील मुला मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी विखे यांच्या जनसेवा फाऊंडेशनने स्वीकारली आहे. त्यांचे आरोग्य ही जबाबदारी देखील विखे कुटुंबाने घेतली आहे. इतकेच नाही तर या कुटुंबातील उपवर कन्येचे कन्यादानही जनसेवा करणार आहे. या शिवाय गारपीट वादळवार्यात निवारा हरवून बसलेल्या या कुटुंबाच्या घराची डागडूजीही जनसेवा करणार आहे.
राजकारण सर्वच करतात. पण अशा प्रकारचे औदार्य दाखविण्याची मानसिकता फार थोड्या नेत्यांकडे असते. महाराष्ट्रात अशी कुवत असलेले किमान शंभर राजकीय कुटुंब असतील. त्यांना या बळीराजाने प्रस्थापित बनवले आहे, तो बळीराजा संकटात असतांना डॉ. विखे यांच्यासारखे या शंभर कुटुंबांनी दाखवायला त्यांच्या इच्छाशक्तीशिवाय कुणाची हरकत असणार...