मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतले अयोध्येत रामाचे दर्शन
अयोध्या, दि. 01 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हनुमान गढीचे दर्शन घेऊन पूजा केली. तसेच शरयू नदीच्या काठावर जावून आदित्यनाथ यांनी पूजा केली. यावेळी त्यांनी शरयू नदीच्या काठाची डागडुजी करण्याचे आणि त्याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येत जावून दर्शन घेणारे आदित्यनाथ हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी 2002 साली राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येतील रामाचे दर्शन घेतले होते. आदित्यनाथ हे रामाचे भक्त असल्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.