दक्षिण मुंबईतील 8 वाहनतळांवर लवकरच ऑनलाईन बुकिंग होणार सुरु
मुंबई, दि. 17 - आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी वा पर्यटनासाठी दक्षिण मुंबईत येणा-या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. या वाहनधारकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेची वाहनतळ सुविधा आहे. मात्र अनेकदा यापैकी कोणत्या वाहनतळावर जागा उपलब्ध आहे? याची माहिती नसल्याने वाहनधारकांची फिर-फिर व गैरसोय होत असे. ही बाब लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील 8 वाहनतळांच्या ठिकाणी ’ऑनलाईन बुकिंग’ सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बुकिंगची प्राथमिक तांत्रिक चाचणी नुकतीच घेण्यात आली असून ही चाचणी यशस्वी झाली आहे, अशी माहिती ’ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी दिली आहे.
ऑनलाईन बुकिंग / प आधारित बुकिंग सुविधेच्या पहिल्या टप्प्यात 8 वाहनतळांवर ही सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील 3 वाहनतळांवर 222, हुतात्मा चौकातील 2 वाहनतळांवर 147, काळाघोडाजवळ 50, एरॉस जंक्शनला 42 आणि रिगल सर्कलला 24 याप्रमाणे 8 वाहनतळांवर एकूण 485 जागा वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. या वाहनतळांवर ऑनलाईन बुकिंग / प आधारित बुकिंग सुविधा साधारणपणे पुढील 3 महिन्यात सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
या बाबत घेण्यात आलेल्या प्राथमिक चाचणीच्या वेळी महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्याशिवाय अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. विजय सिंघल, उपायुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) श्री. रमेश पवार, प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, ’ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.