दोन सराईत चोरांना अटक, 33 दुचाकी जप्त
पुणे, दि. 17 - हिंजवडी फेज 3 येथील टीसीएस कंपनीच्या कंपाउंडजवळ दुचाकीची पाहणी करत असताना दोन सराईत चोरांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख रुपयांच्या 33 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.चंद्रकांत राजेंद्र गायकवाड (29, रा. उस्तुरी, उस्मानाबाद) आणि विठ्ठल अशोक उंबरे (32, रा. उस्मानाबाद), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मुळे यांनी ही कामगिरी केली. मुळे यांना टीसीएस कंपनीच्या कंपाउंडजवळ अज्ञात तरुण गाड्यांची पाहणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मुळे यांनी तात्काळ जाऊन दोघांना ताब्यात घेतले. मागील काही दिवसांपासून परिसरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी केली असता तब्बल 33 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 27 स्प्लेंडर, 1 पल्सर, 1 हिरोहोंडा ग्लॅमर, 1 यामाहा आर वन, 1 अॅक्टिव्हा आणि इतर 2 या वाहनांचा समावेश आहे. ही सर्व वाहने त्यांनी मौजमजेसाठी चोरली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या वाहनांबाबत दोन्ही आरोपींवर चाकण पोलीस ठाणेमध्ये 7, हिंजवडी पोलीस ठाणे 6, भोसरी व एमआयडीसी पोलीस ठाणे प्रत्येकी 4, पिंपरी पोलीस ठाणे 2, कोंढवा, खडक, देहूरोड व राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी 1 गुन्हा उघडकीस आला आहे. इतर सहा दुचाकींबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे.