Breaking News

दिल्ली विद्यापीठात स्थानिक विद्यार्थ्यांना आरक्षण, अन्य शिक्षक,विद्यार्थ्यांचा विरोध

नवी दिल्ली, दि. 01 - दिल्लीतील स्थानिक रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात आरक्षण दिल्यामुळे काही शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जोरदार  घोषणाबाजी केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये विद्यापीठाकडून 85 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 
दिल्ली विधानसभेत गुरुवारी (29 जून) सरकारने दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या 28 महाविद्यालयात प्रवेश घेणा-या दिल्लीतील स्थानिक विद्यार्थ्यांना 85 टक्के  आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. दिल्ली विद्यापीठातील शिक्षक संघाने कार्यकारी परिषदेच्या आगामी बैठकीत या प्रस्तावास विरोध करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
दिल्ली विद्यापीठाची ओळख त्याच्या वेगवेगळ्या कार्य,गुणांमुळे विद्यापीठाचा मान राखला पाहिजे. यापूर्वी काही राजकीय पक्षांनी विद्यापीठाचा मान न राखता काही  निर्णय घेतले. त्यामुळे हा राजकीय हस्तक्षेप असून राजकीय आधारावर दोन गटांमध्ये फुट पाडण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका  आभा देव हबीब यांनी सांगितले.