Breaking News

मुंबई विमानतळावर 6 किलो कोकेनसह एकाला अटक

मुंबई, दि. 12 - मुंबई विमानतळावर 6 किलो कोकेन जप्त करण्यात आले असून याची किंमत सुमारे 36 कोटी रुपये आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही  कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव फ्रेडी अन्ड्रेस आहे.
लॅपटॉपमधून कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या तस्कराला ताब्यात घेण्यात आले. लॅपटॉपच्या आत  कोकेन लपवून तो नेत होता. तपास केला असता त्यातून 12 पाकिटे कोकेन जप्त करण्यात आले.