Breaking News

पालखी सोहळ्यात यावर्षी शासनाच्या वतीने 108 टोल फ्री क्रमांक

पुणे, दि. 12 - श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यावर्षी प्रथमच शासनाच्या वतीने 108 हा टोल फ्री क्रमांक मोफत व  तातडीच्या रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आला आहे. वारी काळात एक कार्डियाक रुग्णवाहिका व इतर 75 रुग्णवाहिका 24 तास सेवेसाठी सज्ज  असणार आहे. सुमारे 100 कर्मचारी व त्यांच्या नियंत्रण कक्षातील कर्मचारी सेवेसाठी अहोरात्र उपलब्ध असणार आहे.
वारीमध्ये या रुग्णवाहिका नेमक्या कोठे आहेत हे माहिती व्हावे यासाठी पालखी मार्गावर माहिती पत्रके लावण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी  दिंडीचालकांचे मोबाईल नंबर घेण्यात आले असून त्याद्वारे त्यांच्याशी नियंत्रण कक्षातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी दिंडी चालकांनी हे नंबर  संबंधित पालखी सोहळ्यातील प्रमुखांकडे किंवा कार्यालयात अथवा बीव्हीजी नियंत्रण कक्षाकडे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. वारीतील एखाद्या रुग्णाला  तातडीने गरज लागल्यास 108 हा नंबर डायल करावा. आपले नेमके ठिकाण सांगितले गेले पाहिजे व कॉल ड्रॉप होऊ नये. यासाठी कंपन्याद्वारे मोबाईल टॉवर  उभारण्यात येणार असल्याने अशी अडचण येणार नाही.