उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन महिन्यात रोड रोमियोंविरोधात 500 तक्रारी दाखल
लखनौ, दि. 01 - योदी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यावर रोड रोमियोंविरोधी पथकाची स्थापना केली होती. गेल्या दोन महिन्यात या पथकाने सुमारे 500 तक्रारी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
सार्वजनिक ठिकाणी, कन्या शाळा आणि महाविद्यालये, मॉल अशा सुमारे 2 लाख ठिकाणी सुमारे 3 लाख 38 हजार जणांना समज दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. असे गैरवर्तन करणार्यांना सुरुवातील समज देऊन सोडून देण्यात आले आणि तरीही पुन्हा असे गैरवर्तन करताना आढळणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले होते. या पथकातील सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. 22 मार्च ते 28 मे दरम्यान रोड रोमियोंविरोधात सुमारे 538 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. यामध्ये भारतीय दंड संहितेसह अन्य कायद्याच्या आधारे सुमारे 1 हजार 264 जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.