Breaking News

डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकीे महाविद्यालयात अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया 5 जूनपासून सुरू

कराड, दि. 01 (प्रतिनिधी) : बनवडी (ता. कराड) येथील जी. के. गुजर ट्रस्टच्या डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सोमवार, दि. 5 जूनपासून ’प्रथम वर्ष अभियांत्रिकी’साठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर व सचिव डॉ. सौ. माधुरी गुजर यांनी दिली.
महाविद्यालयास, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांची ’प्रथम’ व ’थेट द्वितीय’ वर्षाकरीता प्रवेशपत्र स्विकारण्याचे कराड तालुक्याचे एकमेव ’अधिकृत सुविधा केंद्र’(फॅसिलीटी सेंटर) म्हणून मान्यता असून, ’एफ् सी सेंटर क्रमांक 6303’ असा आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना ’ऑनलाईन नोंदणी’साठी मोफत सुविधा उपलब्ध आहे.
5 जून ते 17 जून अखेर प्रवेश अर्जाची विक्री होणार आहे. अ‍ॅप्लिकेशन कीटचे मुल्य खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी, रूपये 800 तसेच इतरमागास व अन्य सर्व राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी, रूपये 600 असे आहे. 5 जून ते 17 जून अखेर विद्यार्थ्यांकडून ’ऑनलाईन अर्ज’ स्विकारण्यात येणार आहे. यावेळी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून घेण्यात येईल. तसेच  प्रवेश निश्‍चिती प्रक्रिया होणार आहे. 19 जूनला सायंकाळी 5 वाजतां प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादीसंदर्भात कांही तक्रार व आक्षेप असतील तर 20 ते 21 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याबाबतीत सादरीकरण करण्यात येईल. 22 जून रोजी सायंकाळी पांच वाजतां ’अंतीम गुणवत्ता यादी’ जाहीर होणार आहे.
महाविद्यालयाचे सुविधा केंद्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी (शासकीय सुट्टी व रविवारसह) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेकरीता महाविद्यालयाचा मोबाईल (भ्रमणध्वनी) क्रमांक 7776916135 वर तसेच उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, भरत कोळी (9860027210), राजेंद्र दळवी (9421910632), किरण पवार (8485884010) व राहूल शिवदास (9021745191) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.