इंडोनेशियातील बालीमध्ये भरणार यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन
पुणे, दि. 06 - विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणारं यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन 10 सप्टेंबर रोजी इंडोनेशियातील बालीमध्ये होणार आहे. यंदा या संमेलनाचं सातवं वर्ष आहे.
हे संमेलन वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित असेल अशी माहिती विश्व मराठी परिषदेचे प्रमुख सल्लागार डॉ.श्रीपाद जोशी यांनी दिली. केवळ मराठी प्रांतापुरता विचार न करता जगभरातील मराठी माणसांचा स्नेहमेळावा या उद्देशातून हे संमेलन गेल्या 6 वर्षांपासून आयोजित करण्यात येतं आहे. गेल्यावर्षी हे साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिम्पूमध्ये 22 आणि 23 सप्टेंबर रोजी झालं होतं. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लेखक संजय आवटे हे होते.