Breaking News

स्थायी समितीत 3 कोटी 65 लाखांच्या खर्चास मान्यता

पूणे, दि. 09 - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी पालकांना व हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अर्थसहाय्य  देण्यात येणार आहे. या अंतर्गत 120 पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अदा करण्यासाठी सुमारे 14 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासकामे  करण्यासाठी येणार्‍या सुमारे 3 कोटी 65 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. प्रभाग क्र. 8 दत्तनगर झोपडपट्टीमध्ये जुने ब्लॉक पाडून 26 सिट्सचे शौचालय  बांधण्यासाठी येणार्‍या सुमारे 28 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ई-निविदा  प्रणालीसाठी डिजीटल की पुरवठा व नुतणीकरण करण्यासाठी येणार्‍या सुमारे 18 लाख 19 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात  आली.
सन 2017-18 चा वित्तीय वर्षात इ. 10 वी इ. 12 वी मधील 85 % पेक्षा जास्त गुण संपादन करणार्‍या 127 पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी येणार्‍या सुमारे 15  लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 43 मधील स्मशानभूमीची उर्वरित स्थापत्य विषयक कामे  करण्यासाठी येणार्‍या सुमारे 67 लाख 19 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. 35 मधील स.नं. 1 मध्ये वाचनालयासाठी बैठकव्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 1 कोटी 94 लाख 13 हजार  रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.