मराठवाड्यात जोरदार पाऊस; बळीराजा सुखावला
औरंगाबाद, दि. 09 - मराठवाडाभर जोरदार पाऊस पडला असून बळीराजा या पावसाने सुखावला आहेे. काही भागात दोन दिवसांच्या पावसामुळे नदयांना पुरही आला आहे. लातूर जिल्हयातील जानवळ आणि चाकुरला जोडणारा पूल कालच्या पावसात गेला वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला तर जालना जिल्हयातील छोटया नदया भरल्या आहेत. औरंगाबाद शहरात तर आज पहिल्या पावसाच्या तडाख्यात धांदल उडाली शहरातील रस्त्यांवर आणि नाले भरून पाणी वाहत होते.