Breaking News

बैल चोरीचा संशय घेऊन दलित महिलेला मारहाण; 23 जण अटकेत

बुलडाणा, दि. 07 - जिल्ह्यात बैल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 50 वर्षाच्या दलित महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  23 जणांना अटक करण्यात आली. आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 जून रोजी  घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दलित महिलेने बैल चोरी केल्याचा प्रयत्न केला असा आरोप गावातील सखाराम उगले या इसमाने केला होता. त्यानंतर त्याने आणखी तीस जणांना बोलावून या  महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण केली. या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या घटनेबाबत माहिती मिळाली. पीडित महिलेने केलेली तक्रार आणि  वैद्यकीय अहवालाच्या आधारे 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.