Breaking News

पाकिस्तानच्या बहाव रियाझची ‘चॅम्पियन्स’ स्पर्धेतून माघार

लंडन, दि. 07 - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारताविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना 46व्या षटकात वहाबच्या घोट्याला दुखापत झाली. वैद्यकीय तपासणीमध्ये दुखापत गंभीर असून स्बायूंवर ताण पडला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वहाबला किमान 2 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
वहाबने पहिल्या सामन्यात भारताविरूद्ध 8 षटकात 87 धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीकादेखील झाली होती. दरम्यान, वहाबच्या जागी बदली खेळाडू संघात समाविष्ट करण्यास परवानगी देण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे.
पाकिस्तानचा स्पर्धेतील साखळी फेरीचा दुसरा सामना बुधवारी (7 जून) द. आफ्रिकेशी होणार आहे.