Breaking News

गुडगाव सामूहिक बलात्कार - हत्याप्रकरणातील आरोपींचे रेखाचित्र प्रसिद्ध

गुडगाव, दि. 07 - हरियाणामधील गुडगाव येथील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील तीन आरोपींचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. पोलिसांनी  यासंदर्भातील तपास वेगाने सुरू केला आहे. या रेखाचित्राच्या आधारे रिक्षावाल्याची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 29 मे रोजी तीन इसमांनी एका  महिलेच्या नऊ महिन्यांच्या मुलीला रिक्षातून फेकून देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेत चिमुरडीचा मृत्यू झाला.
सुरूवातीला भीतीमुळे महिलेने या घटनेबाबत कोणालाही सांगितले नव्हते. मात्र त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू  केला. महिलेने सांगितल्यानुसार, तिचे पतीबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे ती तिच्या मुलीला घेवून माहेरी जात होती. त्यावेळी ज्या रिक्षात ती बसली त्या रिक्षात  आधीपासून बसलेल्या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच महिलेने विरोध केल्यामुळे तिच्या मुलीला रिक्षातून बाहेर फेकले होते.