Breaking News

वटपौर्णिमेनिमीत्त संगमनेरात 2111 वटवृक्षांचे रोपन

संगमनेर, दि. 10 -   पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपनाची राज्यात सर्वात मोठ्या असलेल्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमीत्त संगमनेर  तालुक्यातील गावा-गावात व वाडीवस्तीवर काल गुरुवारी2111 वटवृक्षांचे रोपन करण्यात आले. वटवृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली  आहे. या उपक्रमास महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
वटसावित्री पोर्णिमेनिमित्त सुकेवाडी, निमज, धांदरफळ, वेल्हाळे, देवकौठे, गुंजाळवाडी व संगमनेर शहरातील अभिनवनगर येथे वटवृक्षांचे रोपन करण्यात आले. यावेळी  दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, सौ.शरयु देशमुख सभापती सौ. निशा कोकणे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, रामहरी कातोरे, किशोर पवार,  सौ. योगिता पवार, सौ. रुपाली औटी, सौ. सोनाली शिंदे, सौ. सुहासिनी गुंजाळ, शमा शेख, सौ. मेघा भगत, सौ.कविता कहांडळ, सौ. सोनाली गुंजाळ, मुख्याधिकारी  डॉ. सचिन बांगर, श्रीनिवास पगडाल, अफजल शेख, मिलींद औटी, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, मनिषा शिंदे, दत्तु कोकणे, नामदेव कहांडळ आदि  उपस्थित होते. यावेळी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांचे जतन करण्याची शपथ घेण्यात आली. सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या  संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभिमानाचे हे 12 वे वर्ष आहे. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिमान लोकचळवळ  झाली. वृक्षसंस्कृती जोपासणार्‍या या चळवळीने देशपातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे. यामुळे वृक्षतोड  टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे. भारतीय संस्कृतीत अत्यत महत्वाचा असणार वटपोर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाच्या  झाडामुळे हिरवीगार सावली, परिसराचे वैभव, आयुर्वेद, पूजापाठ व सजीवांसाठी शुद्ध ऑक्सीजन मिळणार आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी  आहे. आमुर्वेदामध्मेही वटवृक्ष, रुई, उंबर, पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सीजन निर्माण  करतात. म्हणून असा हा वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभिमान समितीच्यावतीने प्रत्येक गावात व वाडीवस्तीसाठी 2111  वटवृक्षाचे रोपे देण्यात आली आहे. महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात आले असून संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम संपूर्ण देशाला मार्गदर्शक  ठरणार आहे. यावेळी परिसरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.