Breaking News

टी20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द?

कराची, दि. 21 - दर दोन वर्षांनी टी20 विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करता यावे, या कारणासाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आयोजित करणे रद्द होऊ शकते, अशी  शक्यता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी व्यक्त केली आहे. 2021च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे  आहे. पण जर या स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या  चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आणि 2019मध्ये होणा-या विश्‍वचषक स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची संख्या वगळता काहीही फरक नसल्याची भावना तज्ञांकडून व्यक्त  करण्यात येत आहे. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेसारख्या जागतिक स्पर्धेचे अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल, तर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन बंद करण्याची दाट  शक्यता आहे.