Breaking News

जागतिक हॉकी लीग : भारताला 3-1ने नमवून नेदरलँड्स गटात अव्वल

लंडन,, दि. 21 - जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या साखळी सामन्यात आज नेदरलँड्सच्या संगाने भारतावर 3-1 ने मात केली आणि गुणतालिकेत  अव्वल स्थान कायम केले. नेदरलँड्सने सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवले. नेदरलँड्सच्या आक्रमणाने भारतीय खेळाडूंना पूर्वार्धात सळो की पळो करून सोडले.  नेदरलँड्सतर्फे ब्रिंकमॅनने दुस-या मिनिटाला गोल करत 1-0ची आघडी मिळवून दिली. लगेचच 12व्यामिनिटालाही नेदरलँड्सने गोल केला. त्यानमतर 24व्या  मिनिटाला गोल करून नेदरलँड्सने 3-0ची आघाडी घेतली. पूर्वार्धात भारताकडूनही आकाशदीपने 1 गोल केला. उत्तरार्धात मात्र दोन्हगी संघांनी एकही गोल केला  नाही. त्यामुळे भारताने सामना 3-1ने गमावला आणि गटात दुसरे स्थान राखले.