Breaking News

नोएडा परिसरात एप्रिल 2018 पर्यंत मेट्रो सेवा

लखनौ, दि. 07 - नोएडा परिसरात एप्रिल 2018 पर्यंत मेट्रो सुरू केली जाणार आहे. नोएडा ते ग्रेटर नोएडा मेट्रो कॉरिडॉरची सुरक्षा ॠपीएसी’ सुरक्षा संस्था करेल. यासाठी 49 व्या बटालियनच्या चार कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षा कर्मचा-यांचे वेतन व भत्ता राज्य सरकारकडून दिला जाईल. नोएडा मेट्रो रेल्वे महामंडळाकडून नोएडा-ग्रेटर नोएडा वातानुकूलित सिटी बससेवा अंतर्गत प्रवाशांच्या सुविधेसाठी मोबाईल पचे उद्घाटन मुख्य सचिव राहुल भटनागर यांच्या हस्ते करण्यात आले.
नोएडा मेट्रो रेल्वे महामंडळाच्या 12 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मोबाईल पच्या माध्यमातून बस थांब्यांची माहिती मिळणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी नोएडा मेट्रो प्रकल्पामध्ये ॠवन सिटी - वन कार्ड’ लागू केले जाणार आहे. यात एक कार्ड मेट्रो, सिटी बस, वाहनतळ व किरकोळ भरणा करण्यासाठी केला जाऊ शकतो. मेट्रो कॉरिडॉरच्या स्थानकांवर अत्याधुनिक कॅमेरे व अन्य सुरक्षा उपकरणे लावली जाणार आहेत. नोएडा मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 मे 2017 रोजी मंजुरी दिली होती. यात केंद्र सरकार 970 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.