Breaking News

फ्रेंच ओपन : सानिया-डॉडीगचा पराभव करून बोपण्णा-डॅब्रोव्हस्की जोडी उपांत्य फेरीत

पॅरिस, दि. 07 - फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि कॅनडाच्या ग्रॅब्रियल डॅब्रोव्हस्की जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या जोडीने भारताच्या सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इवॅन डॉडीग जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच बोपण्णा-डॅब्रोव्हस्की जोडीने आक्रमक खेळ केला आणि पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुस-या सेटमध्ये सानिया-डॉडीग जोडीकडून चांगला संघर्ष पाहायला मिळाला. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. बोपण्णा-डॅब्रोव्हस्की जोडीने दुस-या सेटसह सामनाही खिशात घातला.