Breaking News

भारतीय संघाचे सर्व सामने पाहणार - मल्ल्या

लंडन, दि. 07 - भारतीय संघाचे सर्व समाने पाहणार असल्याचे ट्विट उद्योगपती आणि कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्या यांनी केले आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावल्यामुळे मल्ल्या पुन्हा चर्चेत आला. या घटनेवर भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे मल्ल्या चांगलाच चिडला आहे. 
भारतातील प्रसारमाध्यमे माझ्याबद्दल उगाचच सनसनाटी निर्माण करत आहेत . . त्यांच्या या उद्योगामुळे यापुढील भारतीय संघाच्या सर्व सामन्यांना उपस्थित राहण्याचा विचार करतोय, असे ट्विट त्याने केले आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टन स्टेडियमवर रविवारी झालेला भारत-पाक सामनाला मल्ल्या उपस्थित होता. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी गेलो होतो. प्रसारमाध्यमांनी ते जास्तच मनावर घेतलेले दिसते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील एक सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम कर्णधार व सर्वोत्तम माणूस आहे, असे दुसरे ट्विट त्याने केले आहे. भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून देशाबाहेर पसार मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.