Breaking News

अवैध रेती उत्खनन करणार्‍यांवर कारवाई 18 आरोपींविरुद्ध गुन्हा; 15 जणांना अटक

बुलडाणा, दि. 05 - पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या रेती उपसा करणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई करीत तब्बल 1 कोटी 32 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, याप्रकरणी 18 आरोपींविरुद्ध नांदुरा पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करुन 15 जणांना अटक केली आहे. तर तीन जण पसार झाले आहेत.
तालुक्यातील काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या रेती उपसा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 जूनचे सकाळी 2 वाजेच्या सुमारास अत्यंत गुप्तता राखत    नदीपात्रात छापा टाकला. यावेळी नदीपात्रात एवढ्या रात्री वाहनांची रेलचेल पाहून पोलिसांनाही आश्‍चर्य वाटले. रात्री 2 वाजेच्या सुमारास केलेल्या या धाडसी कारवाईत पोलिसांनी रेती उपसा करणारी बोट, इंजिन, पोकलँड, 4 टिप्पर, 8 ट्रॅक्टर, 3 मोटारसायकली, 4 टोपले, 4 फावडे असा एकूण 1 कोटी 32 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.