रस्त्यावरील समस्याग्रस्त बालकांमध्ये नवी उमेद जागृत करा - पंकजा मुंडे
मुंबई, दि. 08 - राज्यातील रस्त्यावर, पुलाखाली, सार्वजनिक पार्कमध्ये अनाथ किंवा पालकांसोबत राहणार्या समस्याग्रस्त बालकांना व त्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात एक नवी उमेद जागृत करण्यासाठी शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चिराग पच्या पुन्हा उद्घाटनानिमित्त आयोजित तमसोमा ज्योतिर्गमय या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सर्वश्री संजय केळकर, अतुल सावे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, औरंगाबादचे महापौर बापू घडामोडे, आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, शालीनी कर्हाड, अस्मा शेख पटेल, विजय जाधव, आशा राणे, जरीम गुप्ता, स्वरुप रावल, श्री.बागला, आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी आदिंची उपस्थिती होती.
श्रीमती मुंडे म्हणाल्या की, बालकांच्या सुरक्षेची समस्या फार महत्वाचा विषय आहे. त्यासाठी चिराग नावाचे प तसेच रस्त्यावर राहणार्या मुलांच्या सशक्तीकरणासाठी तयार झालेले एस.ओ.पी. महत्वाचे आहे. बालकांचे शोषण हे जवळच्या व्यक्तींकडूनच जास्त प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बालकांच्या शोषणाविरुद्धचा आवाज दाबला जातो. तो आवाज चिराग पच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक भावनेतून जनतेने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामान्य जनतेमध्ये बालकांच्या हक्कांबाबत कायदे व नियमांची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. तसेच बालकांविषयी महत्वाचे कायदे मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा, पोक्सा कायदा, काळजी व संरक्षण या सर्व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी होणे गरजेचे आहे, असेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
चिराग प न्ड्रॉईड व आय.ओ.एस. मोबाईल वर उपलब्ध
बालकांच्या अधिकारांचे संरक्षण कसे होईल तसेच या हक्कांचे सरंक्षण करण्याची यंत्रणा व जनतेमध्ये सुसंवाद कसा साधला जाईल, बालकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्काची माहिती लोकांपर्यंत पोहचण्याकरीता चिराग नावाचे प आयोगाने विकसित केले आहे. हे प न्ड्रॉईड व आय.ओ.एस. मोबाईल वर उपलब्ध आहे. या पवर तक्रार आल्यावर आयोग त्याची त्वरीत दखल घेऊन पुढील कार्यवाही करीत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.