पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे मध्य प्रदेशमधून 15 जणांना अटक
भोपाळ,, दि. 21 - चॅम्पियन करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दणदणीत पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या नावाचा जयघोष केल्याप्रकरणी मध्य प्रदेशमधील बुरहानपूर येथून 15 जणांना अटक केली. भारताचा पराभव झाल्यानंतर या 15 जणांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली असून फटाके फोडून जल्लोषही साजरा केला होता. या 15 जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अटक केली.
