Breaking News

बेनामी मालमत्ता : लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी, मुलांविरोधात गुन्हा दाखल

पाटणा,, दि. 21 - बेनामी मालमत्तेप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री मुलगा तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि राज्यसभेच्या खासदार मीसा भारती  यांच्या विरोधात आयकर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयकर विभागाने बेनामी मालमत्तेप्रकरणी लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवा यांच्या  विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे.
आज आयकर विभागाने राबडी देवी, तेजस्वी यादव, मीसा भारती, त्यांचे पती शैलेष, मुलगी रागिणी आणि चंदा यांच्या नावे असलेली संपत्ती जप्त केली. यापूर्वी  आयकर विभागाने लालू यांच्या मुलांशी संबंधित बेनामी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.