जनावरे खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालणा-या अधिसूचनेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 15 जूनला सुनावणी
नवी दिल्ली, दि. 09 - केंद्र सरकारच्या जनावरे विक्री व कत्तलीच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर 15 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या निर्णयातील तरतुदी घटनेविरोधातील असल्याचे याचिकेत म्हटले आहे. न्या. अशोक भूषण व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर लवकर सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही याचिका हैदराबादमधील मोहम्मद अब्दुल फहीम कुरेशी यांनी दाखल केली आहे. केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व कर्नाटक यांसारख्या राज्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार नसल्याचे म्हटले आहे. कारण येथील लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल.