’धोनी 2019चा वर्ल्ड कप खेळेल,’ सेहवागला विश्वास
मुंबई, दि. 09 - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अद्यापही आपला फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे धोनी आगामी विश्वचषकासाठी संघात असणार की नाही? याची आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे.
मात्र, अशा वेळी टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. धोनी विश्वचषकासाठीच्या संघात नक्की असेल. असा विश्वास सेहवागनं व्यक्त केला आहे. एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात बोलताना त्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या बीसीआयकडून भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे. यामध्ये सेहवागचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सेहवागच्या या वक्तव्याला फार महत्व आहे.
मागील वर्षभरापासून धोनीला आपला फॉर्म गवसलेला नाही. पण तरीही सेहवागनं धोनीची पाठराखण केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध कर्णधार कोहलीनं धोनीच्या आधी हार्दिक पंड्याला फलंदाजीसाठी बोलावलं. त्याच्या या निर्णयानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण पंड्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये तीन चेंडूंत तीन षटकार ठोकले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचा कार्यकाळ आता संपणार आहे. त्यामुळे यासाठी कुंबळेसह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, लालचंद राजपूत यांची नावं चर्चेत आहेत.