पेट्रोल, डिझेलचे दर 16 जूनपासून दररोज बदलणार
नवी दिल्ली, दि. 09 - पेट्रोल व डिझेलचे दर 15 दिवसांनी बदलणारे दर आता 16 जूनपासून दररोज बदलणार आहेत, अशी माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-याने दिली. 1 मेपासून पुदुच्चेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर व चंदीगढ या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात आली होती.
भारत पेट्रोलियम लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांची आधीपासूनच ही मागणी होती. या तीन कंपन्या देशातील एकूण पेट्रोल पंपापैकी 95 टक्के हिस्सा स्वत:कडे ठेवतात. देशभरात एकूण 58 हजार पेट्रोल पंप आहेत. दररोज किंमती निश्चित झाल्याने बाजाराची स्थिती अधिक चांगली होऊ शकते. यामुळे इंधनाच्या किंमतीतील चढ-उतारावर नियंत्रण ठेवता येईल, असे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.