Breaking News

क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य 15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना व तरुणांना व्यायामासाठी व खेळासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 75:25 शासन व संस्था हिस्सा या प्रमाणात क्रीडा सुविधा निर्मितीस व क्रीडा साहित्यासाठी अनुदान देण्यात येते.
शासनाच्या मान्यताप्राप्त सरकारी खाजगी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महावद्यिालय, कृषी, महाविद्याय, तंत्र शिक्षण व वैद्यकीय महाविद्यालय इ. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या शाळा, सार्वजनिक विश्‍वस्त अधिनियम -1950, किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभागामर्फत चालविण्यात येणार्‍या आश्रमशाळा, राज्य शासनाने विकसित केलेली क्रीडा संकुले या योजनेसाठी पात्र असतील. क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या अंतर्गत क्रीडांगण विकसित करणे, विविध खेळाच्या क्रीडांगणाची निर्मिती करणे, बंदिस्त प्रेक्षागृह बांधणे, जलतरण तलावाचे बांधकाम करणे, वेलोड्रम, शुटींग रेंजची निर्मिती यासाठी 10 ते 120 लक्ष या मर्यादेत अनुदान दिले जाते. तर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या अंतर्गत अ‍ॅथलेटीक्स, फुटबॉल, हॉकी, टेनिस, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, कुस्ती,खो-खो, बॉक्सिंग, जलतरण, बास्केटबॉल, शुटींग, तायक्वांदो, अद्यावत व्यायाम साहित्य इ. क्रीडा साहित्य घेण्यासाठी 1 ते 15 लक्ष या मर्यादेत अनुदान दिले जाते. पात्र संस्थांनी दि. 15 जून 2017 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी कले आहे.