पाकिस्तानच्या लष्करी कारवाईत दोन आत्मघातकी हल्लेखोरांसह 12 जण ठार
बलुचिस्तान, दि. 09 - पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत दोन आत्मघातकी हल्लेखोरांसह 12 जणांना ठार केले आहे. गेल्या आठड्यात एका अभियानाअंतर्गत पाकिस्तानी लष्कराने इसिसचे तळ उद्धवस्त केले असून मस्तंग भागात 1 जून ते 3 जूनपर्यंत गुप्त माहितीच्या आधारे दगशतवादाविरुद्ध अभियान केल्याचे पाकिस्तान लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
मस्तंगपासून 36 किलोमीटर दक्षिण-पूर्व भागात लष्कर ए झांगवी अल आलनी या दहशतवादी संघटनेचे 10-15 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, असे एका अधिका-याने सांगितले. ही संघटना इसिस या दहशतवादी संघटनेच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती. यांचा उद्देश इसिसला बलुचिस्तानमध्ये आश्रय देण्याचा होता. तीन दिवसांच्या या मोहिमेत दहशतवाद्यांसह दोन लष्कर अधिकारी आणि पाच सुरक्षा कर्मचा-यांचाही मृत्यू झाल्याचे लष्कर अधिका-यांनी सांगितले.